रेड वेलवेट हेअर कलर

समृद्धी धायगुडे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

ट्रेंड्‌स
फॅशनमध्ये कोणत्या रंगांचे ट्रेंड्‌स येतील, याचा काही नेम नाही. गेल्या वर्षीपर्यंत रेड वेलवेट हा रंग खाण्याच्या केकमध्ये तुम्ही पहिला असेल. रेड वेलवेट हा दिसायला इतका छान आहे, की लगेच खाण्याची इच्छा होते. मात्र आता हाच रंग हेअर कलरमधेही उपलब्ध झाला आहे. या रंगाच्या अनोख्या ट्रेंडविषयी...

रेड वेलवेट केकची क्रेझ पाहून रेड वेलवेट कलर करण्याची कल्पना हेअर ड्रेसर्सना आली. त्यामुळे हेअर कलर फॅशन वर्ल्डमध्ये सध्या हा कलर भाव खात आहे. विविध हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये या कलरची क्रेझ वाढत आहे. 

    हा हेअर कलर इंस्टाग्रामवर देखील #redvelvethair या नावाने धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला जर हेअर कलर करण्याची आवड असेल तर हा कलर नक्की ट्राय करावा. 

    लोकप्रिय पॉप सिंगर एरियाना ग्रांडे हिला देखील या फॅशन ट्रेंडची भुरळ पडली. तिने रेड वेलवेट कलर ट्राय केला, 
अर्थात हा हेअर कलर तिला शोभून दिसतोय. 

    फॅशन वर्ल्डमध्ये कोणताही ट्रेंड फॉलो करताना तो आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल का? याचा विचार करावा. आणि त्यानंतर तो ट्राय करावा.

    तुमचे केस सरळ असतील तर डार्क कलर लावावा. पण जर तुमचे केस कुरळे असतील तर तुम्ही थोडा ऑरेंज शेड ट्राय करू शकता. यामुळे तुमच्या केसांची चमक दिसते. 

    रेड वेलवेट शेड ट्राय करायचा असले तर तुमच्या त्वचेची, केसांची पोत लक्षात घ्यावी. हेअर कलर लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. 

    सर्व हेअर कलरप्रमाणेच हा कलर मेंटेन  ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. तुम्हाला प्रत्येक पाच ते सहा आठवड्यांनी हेअर स्टायलिशकडून केसांना रूटीन टचअप करावे लागते. यामुळे केसांची चमक आणि शेड सुंदर आणि चमकदार राहण्यास मदत होते. 

    महाविद्यालयीन तरुणी हा कलर कधीही करू शकतात, मात्र नोकरदार व्यक्तींनी एखाद्या पार्टीला जाताना हा कलर करणे योग्य ठरेल. रेड वेलवेट कलर सर्वांना आवडतो, परंतु हा हेअर कलर हटके हेअरस्टाइल आणि केस किती लहान मोठे आहेत त्यानुसार त्याचे सौंदर्य वाढते.  

संबंधित बातम्या