ग्रहमान - २९ सप्टेंबर ते ५ ऑक्‍टोबर २०१८

   अनिता केळकर 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मेष ः ग्रहांची अनुकूलता मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणेल. व्यवसायात कामातील अडथळे दूर होतील. नवीन कामांना प्रारंभ होईल. नोकरीत विरोधकांचा विरोध मावळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. हातून कौतुकास्पद काम होईल. आखलेले बेत सफल होतील. खेळाडूंना यश मिळेल.

मेष ः ग्रहांची अनुकूलता मनाप्रमाणे गोष्टी घडवून आणेल. व्यवसायात कामातील अडथळे दूर होतील. नवीन कामांना प्रारंभ होईल. नोकरीत विरोधकांचा विरोध मावळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांना कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. हातून कौतुकास्पद काम होईल. आखलेले बेत सफल होतील. खेळाडूंना यश मिळेल.

वृषभ ः हाती घ्याल ते तडीस न्याल. व्यवसायात तुमची मते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. हातून चांगली कामे पूर्ण होतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत इतरांना न जमलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना स्वतःची हौसमौज करता येईल; मात्र अनावश्‍यक खर्च टाळावा. सामूहिक कामात सहभागी व्हाल.

मिथुन ः मनातील ईप्सित साध्य कराल. व्यवसायात नवीन कामे हाती घेऊन वेळेत पूर्ण कराल. मनोनिग्रह चांगला राहील. नोकरीत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. नवीन अनुभव येतील. महिलांना कामाचा उरक दांडगा राहील. कृतीवर भर द्याल. मुलांकडून प्रगतीची चांगली बातमी कळेल.

कर्क ः नशीब साथ देईल. व्यवसायात नवीन प्रकल्प हाती घ्याल. कामात बदल करुन उलाढाल वाढवाल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. स्वतःचे काम संपवून इतरांनाही कामात मदत कराल. घरात नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. कुटूंबासोबत छोटीसी सहल काढाल. तरुणांचे विवाह ठरतील.

सिंह ः जिद्द व चिकाटी या जोरावर अशक्‍य गोष्ट शक्‍य करुन दाखवाल. ‘कष्टाशिवाय फळ नाही’ हे लक्षात येईल. व्यवसायात पैशाची आवक जावक सारखीच राहील. नोकरीत द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे तूर्तास महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. ‘‘शब्द हे शस्त्र आहे’’ हे लक्षात ठेवून कामात गुप्तता राखावी. महिलांनी परिस्थितीशी जुळवून कामे करावीत.

कन्या ः ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ कराल. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे कराल. नवीन आव्हाने स्वीकाराल. मिळालेल्या वेळेचा व संधीचा योग्य उपयोग कराल. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. कामातील उत्साह ओसंडून वाहील. महिलांना मनातील बेत प्रत्यक्षात साकार करता येतील. महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावाल.

तूळ ः व्यवहारी बनून कामे कराल. व्यवसाय कधी गोड तर कधी अधिकाराचा वापर करुन कामे मार्गी लावाल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. पैशाची स्थिती सुधारेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठ नवीन गोष्टी शिकण्याची संधी देतील. कल्पकता दाखवून कामे कराल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठी असल्याने दुःख वाटणार नाही.

वृश्‍चिक ः  ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ याची प्रचिती येईल. व्यवसायात दक्ष राहाल. योग्य नियोजन करुन कामे हातावेगळी कराल. नोकरीत मौनव्रत पाळावे. पूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी मिळेल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवाल. महिलांनी वादविवाद टाळून सुसंवाद साधावा. आप्तेष्ठ, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद होईल. सामूहिक कामात पुढाकार राहील.

धनू ः सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. ते आर्थिक चिंता मिटवतील. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे मार्गी लावाल. विरोधकांचा विरोध मावळेल. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. त्यांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करू शकाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना आवडत्या छंदात वेळ घालवता येईल.

मकर ः आत्मविश्‍वास व इच्छाशक्ती दांडगी राहील. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी डावपेच आखाल. योग्य वेळी योग्य केलेली कृती यश मिळवून देईल. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना कळेल. तुमच्या कामाने तुम्ही इतरांचे लक्ष वेधून घ्याल. घरात महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड न करता खुबीने कामे करुन घ्यावीत.

कुंभ ः महत्त्वपूर्ण घटना घडतील. व्यवसायात कार्य तत्पर राहावे. खेळत्या भांडवलाची आवश्‍यकता भासेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल.

मीन ः मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन कामे मार्गी लावाल. वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करुन घ्याल. नोकरीत मोठ्या व्यक्तींशी ओळखी होतील. भावनेला महत्त्व द्याल, त्यामुळे हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. महिलांना प्रकृतीची उत्तम साथ मिळेल. प्रवास घडेल. मानसिक आध्यात्मिक प्रगती होईल.

संबंधित बातम्या