ग्रहमान

अनिता केळकर
बुधवार, 28 मार्च 2018

ग्रहमान
३१ मार्च ते ६ एप्रिल २०१८
 

३१ मार्च ते ६ एप्रिल २०१८
मेष - व्यवसायात प्रगतीसाठी काही ठोस पावले उचलाल. कार्यक्षमता वाढवून कामाचा उरक पाडाल. अर्थप्राप्ती चांगली होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. मनाप्रमाणे कामे होतील. कामात प्रसंगावधान दाखवाल. बेरोजगारांना नवीन संधी चालून येईल. महिलांना मनःस्वास्थ्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांचे विवाह होतील. 
वृषभ - व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल. जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. कामात कल्पकता दाखवाल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा निर्णय घेताना होईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. शुभकार्यात वेळ चांगला जाईल. 
मिथुन - मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग कराल. ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. तुमच्या कामामुळे तुमची पत व प्रतिष्ठा वाढले. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन कामाची संधी मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. मानसिक आरोग्य उत्तम राहील. 
कर्क - व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित अचूक आखलेत तरच फायदा होईल. कामात सातत्य टिकवावे लागेल. परिस्थितीशी जमवून घेतलेत तर वेळ व शक्ती खर्च होणार नाही. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागले तरी मनावर संयम ठेवून वागावे लागेल. खर्च खूप होईल. त्यामुळे अनावश्‍यक खर्च टाळावा. महिलांनी वादाच्या मुद्‌द्‌यापासून लांब राहाणे चांगले. प्रकृतीची काळजी घ्यावी. बोलताना सावधगिरीने बोलावे. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे. 
सिंह - व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करुन उलाढाल वाढवाल. योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेऊन प्रगती कराल. तुमचे अंदाज खरे ठरतील. नोकरीत शुभ घटना घडतील. रेंगाळलेले प्रश्‍न व कामे मार्गी लागतील. मनाची उमेद व उत्साह वाढेल. विशेष लाभ होतील. महिलांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना चांगली बातमी कळेल. स्वास्थ्य उत्तम राहील. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. 
कन्या - सध्या गुरू, शुक्र, शनी, रवी या महत्त्वाच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला लाभल्याने प्रत्येक बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. पूर्वी केलेल्या कामाचे फळ आता मिळेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी स्विकारालं. प्रवास घडेल. हितचिंतकांची मदत होईल. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांनी कामात कल्पकता दाखवावी. वरिष्ठांकडून कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा. यश मिळेल. 
तूळ - व्यवसाय नोकरीत सकारात्मक दृष्टिकोन फार उपयोगी पडेल. इतरांना न जमणारी कामे हाती घेऊन यश मिळवाल. रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावाल. आर्थिक देणी देता येतील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. कौतुकास पात्र अशी कामगिरी हातून घडेल. वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील. कौटुंबीक स्वास्थ्य महिलांना उत्तम लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना सुसंगती लाभेल. आरोग्य ठीक राहील. सामाजिक कार्य कराल. तरुणांचे विवाह जमतील. 
वृश्‍चिक - तुमची जिद्द व आत्मविश्‍वास हा वाखाणण्याजोगा असेल. व्यवसायात भाग्यवर्धक घटना घडतील. नवीन कार्यक्षेत्र निवडून मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा करुन घ्याल. नोकरीत कामाचा उरक पाडाल. नावलौकिक मिळवाल. परदेश व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन मित्र जोडले जातील. महिलांना काम करण्यास हुरुप येईल. स्वास्थ्य लाभेल. नवीन खरेदीचे मनसुबे साकार होतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक ग्रहमान. 
धनु - व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अर्थप्राप्ती चांगली झाली तरी पैशाची आवक जावक सारखी राहील. नवीन कामे मिळवताना दगदग, धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत "शब्द हे शस्त्र आहे' हे लक्षात ठेवून बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये. नोकरदार महिलांनी मनाची एकाग्रता साधून कामे करावीत. महिलांनी ताण न घेता घरातील कामे करावीत. 
मकर - व्यवसायात महत्त्वाची कामे मार्गी लागल्याने मनावरचा ताण दूर होईल. हमी घेतलेल्या प्रत्येक कामात यश येईल. प्रगतीचा आलेख चढता राहील. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठ नवीन प्रशिक्षणासाठी संधी देतील. सुसंवाद साधून कामे करण्यावर भर राहील. महिलांना मुलांकडून बातम्या समजतील. यश मिळेल. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्धी मिळेल. 
कुंभ - धैर्य व चिकाटीने व्यवसायात यश संपादन करू शकाल. ग्रहमानाची साथ उत्तम मिळेल. अनपेक्षित लाभ होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची स्थिती चांगली राहील. नोकरीत स्वतःचे काम करुन इतरांनाही कामात मदत कराल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगती पथावर राहता येईल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनी आळस झटकून अभ्यासाला लागावे. तरुणांनी अतिसाहस करू नये. 
मीन - ""शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'' या म्हणीचा उपयोग व्यवसायात होईल. ग्रहमानाची फारशी साथ नसली तरी कामात यश मिळवाल. हितचिंतकांची मदत घेऊन कामे हातावेगळी कराल. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करुन कामे उरकाल. पैशाच्या हव्यासापोटी चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्याल. महिलांनी वादविवाद टाळावेत. सहनशिलता बाळगून संघर्ष टाळावा. प्रकृतीच्या तक्रारीकडे वेळईच लक्ष द्यावे.

संबंधित बातम्या